Schaeffler AG

धोक्यांची सूचना लवकर मिळण्यासाठी अनुचित घडामोडींचा अहवाल देणे महत्त्वाचे आहे

Schaeffler हे गुणवत्ता आणि नवकल्पना यांचे प्रतीक आहे. आम्ही हा नावलौकिक अनेक दशकांच्या उत्तम कामाद्वारे मिळवला आहे. कायद्याचे आणि नियमांचे पालन करणे, तसेच जबाबदार सामाजिक कामगिरी हे आमच्या प्रतिष्ठेच्या आणि कंपनीच्या टिकून असलेल्या साफल्याच्या नियमांपैकी आहेत. या प्रतिष्ठेला बेकायदेशीर आणि बेजबाबदार वर्तनामुळे मोठे नुकसान होऊ शकते आणि आमच्या यशाला कायमचा धोका पोहचू शकतो.

ही Incident Reporting System चा वापर एक प्रभावी अनुपालन व्यवस्थापन सिस्टिमचा भाग म्हणून Schaeffler साठी मोठा धोका निर्माण करण्याची शक्यता असलेल्या अनुचित घडामोडींचा शोध लवकर घेण्यासाठी केला जातो. या कारणास्तव अनुपालनाच्या फक्त काही विशिष्ट उल्लंघनांसाठी केलेले अहवालच स्वीकार आणि प्रोसेस केले जातील.

संवादाच्या पारंपारिक पद्धतींसोबत या Incident Reporting System चा वापर केल्याने अनुपालनाच्या उल्लंघनांबद्दल अनामिक राहून माहिती देण्याची सोय आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो. आपण ही माहिती ऑनलाइन किंवा दूरध्वनीद्वारे दिवसभरातून केव्हाही, आठवड्यातील सर्व दिवस, जगभरात कुठेही असताना देऊ शकता.

जर आपल्याला ही माहिती अनामिक राहून द्यायची असेल, तर आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण अहवालाच्या शेवटी एक सुरक्षित पोस्टबॉक्स सेटअप करावा जेणेकरून हा अहवाल प्रोसेस करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आपल्यासोबत अनामिकपणे संवाद केला जाऊ शकतो.

अनुचित घडामोडी झाल्या आहेत किंवा नाही याबद्दल आपल्याला खात्री नसल्यास आपण त्या अनुपालनाशी संबंधित विषयांवर अनुपालन विभागाला अनामिकपणे प्रश्न सुद्धा विचारू शकता.

आपली ओळख उघड करून अहवाल सादर करण्यासाठी आम्ही आपल्याला प्रोत्साहित करतो. व्हिसलब्लोअरच्या सुरक्षिततेसाठी Schaeffler वाजवी आणि योग्य उपाययोजना करते.

अहवाल योग्य वेळी, काळजीपूर्वक, संपूर्णपणे आणि अचूकतेने दिले गेले पाहिजेत.

Incident Reporting System चा गैरवापर करून मुद्दाम चुकीचे अहवाल दिल्याने फौजदारी आणि अनुशासनात्मक कारवाई केली जाऊ शकेल.

या मजकुराला सोपा ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही व्हिसलब्लोअर, कर्मचारी, संपर्क इत्यादींसाठी पुल्लिंगी संबोधनाचा वापर केलेला आहे. साहजिकच ह्या अटी स्त्रीलिंगी संबोधनांसाठी सुद्धा तशाच लागू होतात.

मी अहवाल का सादर करावा?
आपण कुठल्या प्रकरणांचा अहवाल सादर करू शकता?
अहवाल सादर करण्याची पद्धत काय आहे? मी पोस्टबॉक्स कसा सेट करावा?
मला अभिप्रायही मिळेल आणि तरीही माझे अनामिकत्व गुप्त राहील हे कसे शक्य होऊ शकते?
Further information on the Schaeffler whistleblowing system and complaint mechanism
Right to choose between internal and external reporting office